STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

स्त्री... एक प्रेरणा

स्त्री... एक प्रेरणा

1 min
143

ओवी सांगे तुम्हा माझी

महिमा स्त्री जन्माचा

घ्या रे समजून 'ती'ला

होईल उद् धार युगांचा||१||


अनोखीच निर्मिती 'ती'

आहे देवाधिदेवाची

नाही होणार तिच्याशी

बरोबरी गं कोणाची ||२||


लेक,सखी,ताई,आई

भोगे सासुरवाशीण

एक-एका वाटेवर

काटे घेतीया टोचून ||३||


माऊलीच्या हृदयात

माया मधाळ पाझर

यत्ने आटणार नाही

काय वर्णू त्या मी पामर ||४||


सदा दुःखाचीच सल

नारी उरात दाबते

येते माहेर सोडून

नव्या संसारी साजते ||५||


म्हणे नको 'ती'पणती

हवा 'दिवा' ग वंशाला

बट् टा लावे का जननी

स्वतः स्त्रीच्या जन्माला  ||६||


मनी माया फुलविते

चिंता मनाचा कालवा

कधी कळला का बाळा?

ओठी पान्ह्याचा ओलावा  ||७||


नयनी आसवांचा पूर

आनंदाचा गं दुष्काळ

संसाराच्या काळजीने

मनी जपते हिरवळ  ||८||


जग करते पूजन

नदीमाय नि गायीचे

घरची लक्ष्मीच सांगा

का हो वाहन पायीचे  ||९||


वंदा साऊ, रमा मनी

मुजरा जिजाऊ,अहिल्येला

सप्तसूर्यतेजाठायी

आसमंतही लाजला ||१०||



Rate this content
Log in