STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

स्त्री चिंतन

स्त्री चिंतन

1 min
386

जोवर तिचा वास्तूत वास

तोवर सारं काही झकास

नाहीतर तिच्या नसण्याने

जीव होतो नुसता भकास


नानारंगी नानाअवतारी

रूपे तिचे भाव अनेक

ढाळते स्वतःला ती ज्या

भूमिकेत असते एकेक


काय वर्णावे गुण तिचे

ममता त्याग उदारता

कधी माय कधी मावशी

जीव ओतते पूर्ण घराकरता


आत्मा घरचा असते स्त्री

तिच्याविना ना आकार घरा

प्रगतीत तिच्या सामावलेय जग

लेक वाचवा संकल्प करा


Rate this content
Log in