STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

स्तंभ आधाराचा

स्तंभ आधाराचा

1 min
416


"स्तंभ आधाराचा"

आई तुझी छत्र छायाच

वात्सल्याची असे खाण

माय लेकीची ही माया

असे हो जगी महान //


हित लेकीचे दुसऱ्या

नसे आई विण कोणी

सार तत्व देते तिला

सदाच सुख अर्पूनी//


नेत्र पापणी लवता

द्रिष्ट लेकीची काढूनी

साथ लेकीला आईची

लेकी सबळ करूनी //  


संग लेकीला आईचा

धीर या संकटातूनी

स्तंभ आधाराचा हा

वाचविते काट्यातूनी //


कैक लखलाभ सांगे 

मनी भल्याची पणती

लावी लेकीच्या या नावी

दु:ख सु:खाची सोबती//


Rate this content
Log in