STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

स्थितप्रज्ञ विवेकानंद

स्थितप्रज्ञ विवेकानंद

1 min
385

सुख दु:खाचा मांडून तो यज्ञ|

बनलात खरोखरच स्थितप्रज्ञ||१


घेतला जरी संन्याशाचा वेश|

दिला जगा बंधुत्वाचा संदेश||२


होतात तुम्ही जरी बैरागी|

शोभलात खरे कर्मयोगी||३


प्रियदर्शन, प्रतिभावंत|

मूर्तिसम किर्ती दिगांत||४


जळी स्थळी काष्ठी पाषाणी|

उपयुक्त जाहली तुमची वाणी||५


तेजःपुंज चेहरा विलसे हास्य मंद|

प्रज्ञावान कर्मयोगी हे विवेकानंद||६


भगवी वस्रे लेऊनी पावित्र्य राखले|

गुरु रामकृष्ण परमहंसांचे शिष्य शोभले||७


दिगांत किर्ती तेजःपुंज मूर्ती|

जणू भारताच्या स्वप्नांची पूर्ती||८


जन्मभर केली देशाची भक्ती|

परि न धरली कशाची आसक्ती||९


शिकागोत बंधूभाव शिकवून

उंचावली हिंदू धर्माची मान|

सर्वधर्मपरिषद गाजवून

वाढवली भारत मातेची शान||१०


Rate this content
Log in