STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

ससा आणि कासवाची पैज

ससा आणि कासवाची पैज

1 min
434

ससा आणि कासव

दोघे होते मीत्र!!

ससा होता धावणारा

कासव नुसते छायाचित्र!!


एकदा काय झाले

पैज लागली दोघांमध्ये!!

शर्यत होती धावण्याची

नंबर पहिला कोणामध्ये!!


दिवस ठरला पक्का

झाले सर्व जमा!!

शर्यतीचे ठिकाण ठरले

सश्याला नाही तमा!!


दुडुदुडू धावून सश्याने

अंतर केले पार!!

हळूहळू चालणारे कासव

लांब राहिले फार!!


गर्व चढला सश्याला

धूंदी चढली मनाला!!

गाजरे गवत खाऊन

झोपून गेला जनाला!!


हळूहळू कासवाने

चाल सुरु ठेवली!!

स्थिर गती ठेवून

यशाची वाटचाल मिळवली!!


संध्याकाळ होताच

सश्यास आली जाग!!

जावून बघतो तर 

कासवावर आला राग!!


कासव शर्यंत जिंकले

स्थिर गती ठेवून!!

सश्याचा गर्व घेतला

कासवाने हिरावून!!


Rate this content
Log in