STORYMIRROR

sarika k Aiwale

Others

4  

sarika k Aiwale

Others

सरत्या वर्षाची ....

सरत्या वर्षाची ....

1 min
210

सरत वर्ष सरली रात्र

घेते मागोवा वळुनी 

गेल्या दिसाची पावती

वाचते त्या आठवणी

जाहल्या किती भेटी

भेटली ती नवी नाती

सम विचाराची गोती

अक्षयी मनी जपती

भेटले मीच मलाही

कित्येकदा नव्याने

कवितेच्या सहवासाने

ओळखली जुनी नाती

मनाचं मनाशी जुळे

नात गहिरे भावनेचे

पाहतां माग वळुनी

विश्वसास श्वास देती

गुंतली हळव्या मनाची

गुंफण कवितेच्या ओळींची

जडली  माया त्या नाळेशी

रचियेते च्या या जगाशी

सरल वर्ष सांगून गेल

रात्री नंतर असते उषा

साथीस तू शोधू नको

शब्दाच वचन दिलं तुला

लेखणीस कर सोबती

मुक्त कर उरीच्या व्यथा

वाट आंधळी देईल साथ

गर्भात असुदेत विश्वास

सरल वर्ष सरली रात्र

घेता मागोवा वळणाचा

पाऊलखुणच्या सोबतीला

मैत्रीची गोडवा तो नात्याचा


Rate this content
Log in