सृष्टीचे चक्र फिरे,
सृष्टीचे चक्र फिरे,
1 min
11.7K
झाड फुले, अंकुर फुटे,
चैत्र वैशाख वसंत फुले.
जेष्ठ आषाढ ढग काळे,
ग्रीष्म ऋतुत वारा पळे.
वर्षा ऋतू पाऊस पडे,
श्रावण भाद्रपद तळे साचे.
अश्विण कार्तिक दसरा दिवाळी,
शरद ऋतूचे आकाश निळे.
मार्गशीर्ष पौंष,उन कोवळे,
हेमंत आला थंड बरे.
माघ फाल्गुन शिशिर खरा,
तीळगुळ घेऊन गोड बोला.
सहा ऋतू बारा महिने,
आनंदाचे वर्ष बरे,
असेच सृष्टीचे चक्र फिरे,
आले पुन्हा वर्ष नवे.