STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सृष्टी सफर...

सृष्टी सफर...

1 min
11.8K

जावे वाटले कराया 

दिव्य धरती सफर 

प्राण जणू झाले मुके 

हाल पाहता अपार... 


वितळले बर्फ जग 

भासे धुक्यांचे आकाश

असे निसर्ग सावट 

वाटे मिळावा प्रकाश... 


निष्काळजी, अत्याचारी 

माणुसकी फोफावली 

मग देतात दूषणे 

माया सृष्टीची आटली... 


स्वप्नवत स्वर्गभूमी 

वेळी असती जपली

नटलेली वसुंधरा 

रम्य परीच शोभली... 


उपकारी जाण होता 

स्वार्थी बनावे रक्षक 

आपल्याच जीवनाचे 

नको निर्जीव भक्षक... 


Rate this content
Log in