सरल वर्ष ...
सरल वर्ष ...
सरत वर्ष सरली रात्र
घेते मागोवा वळुनी
गेल्या दिसाची पावती
वाचते त्या आठवणी
जाहल्या किती भेटी
भेटली ती नवी नाती
सम विचाराची गोती
अक्षयी मनी जपती
भेटले मीच मलाही
कित्येकदा नव्याने
कवितेच्या सहवासाने
ओळखली जुनी नाती
मनाचं मनाशी जुळे
नात गहिरे भावनेचे
पाहतां माग वळुनी
विश्वासास श्वास देती
गुंतली हळव्या मनाची
गुंफण कवितेच्या ओळींची
जडली माया त्या नाळेशी
रचियेता च्या या जगाशी
सरल वर्ष सांगून गेल
रात्री नंतर असते उषा
साथीस तू शोधू नको
शब्दाच वचन दिलं तुला
लेखणीस कर सोबती
मुक्त कर उरीच्या व्यथा
वाट आंधळी देईल साथ
गर्भात असुदेत विश्वास
सरल वर्ष सरली रात्र
घेता मागोवा वळणाचा
पाऊलखुणच्या सोबतीला
मैत्रीची गोडवा तो नात्याचा
