सप्तपदी
सप्तपदी
1 min
604
सप्तपदीचं पहिलं पाऊल
टाकलं अग्नीच्या साक्षीने
संसाराच्या सुखाचं मागणं
मागितलं अभिमानाने...
प्रत्येक फेऱ्याला
वचनबद्ध झालो
हात हातात घेऊनी
संसार वाटेवर निघालो...
मेंदीतल्या सुगंधाला
श्वासात मी घेतलं
प्रसन्न पावलांनी
माप मी ओलांडलं...
सनईचे सूर
मनात मी साठविले
तुझ्यासवे नव आयुष्यात
पदार्पण मी केले...
