STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्पर्शाचं गाणं

स्पर्शाचं गाणं

1 min
253

प्रत्येक स्पर्शाचं असतं एक बेधुंद गाणं

नवजात शिशुचं हसणं रडणं मधूर संगीत


कुटुंबाचं ही न स्मरता जवळचं वाटणं

प्रेमस्पर्शाचं द्विगुणित हर्षाचं गुपित खास


मैत्रीचं काळजीचं मनमोकळं संवादाचं सत्र

अनोळखीचं ओळखीचं सहवासी असणं

फुलाच्या स्पर्शाचं सुगंधी बहुरंगी फुलणं डोलणं

फुलपाखराचं रुपमधुर गोड किरकिरणं


स्वतःवरच्या विश्वास स्पर्शानं मन शहारनं

अस्पर्शीत डोळस भावनेच्या नजराचं भिडणं

नात्यातलं दुःख नि हसमुख मतभेद कवटाळणं

मस्ती भऱ्या नाटकी खेळाचं मुक्त गुणगुनणं


आपुलकीच्या सगळ्याच स्पर्शनादाचं प्रेम

सतत सानिध्याच्या विळख्यात छंदाचं गीत

अनेक स्पर्शाचं मोरपंखी असं रंगीत गाणं


Rate this content
Log in