स्पर्श
स्पर्श
1 min
12.3K
स्पर्श तो इवलासा,
पिटुकल्या हातांचा,
स्पर्श तो इवलासा,
पिटुकल्या बोटांचा.
स्पर्श तो इवलासा,
वाटतसे हवाहवा,
मनास देतसे तो,
कितीक च ओलावा.
स्पर्श तो इवलासा,
बहरला आनंदाचा,
करिती रोमांचित,
मनातल्या भावना.
फवारे उमटती,
मनात आनंदाचे,
भरभरून माया,
ह्रदयामधे दाटे.