STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

स्पर्श.....

स्पर्श.....

1 min
490

स्पर्श आईचा

मायेच्या उबेचा

स्पर्श बाबांचा

आर्त काळजीचा...


स्पर्श आजीचा

अती प्रेमाचा

स्पर्श आजोबांचा

जरा वात्सल्याचा...


स्पर्श भावाचा

अंतरी करूणेचा

स्पर्श बहिणीचा

लाडिक प्रेमाचा...


स्पर्श सजणाचा

अखंड प्रीतीचा

स्पर्श सजणीचा

अंतरी फुलण्याचा...


स्पर्श लावतो

वेड सार्‍याला

याचे जतन करू

वंदन या सुखाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन