STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

स्फूर्ती दात्री स्री

स्फूर्ती दात्री स्री

1 min
134

तू सा-या जगाला देते स्फूर्ती!

दिगांतरी होय तुझीच किर्ती!!१


विश्व हे गाईन तुझीच आरती!

प्रक्रृती नावे तुच विश्व भारती!!२


रुपे तुझी वर्णू तरी किती मी!

आई ,आजी, मावशी वा मामी!!३


बायको, काकू, आत्या नि बहिण!

वहिनी, मुलगी, मेव्हणी व मैत्रिण!!४


भुमिकात सा-या बसते ती फीट!

सासरी, माहेरी वागावे लागे नीट!!५


लक्ष्मी, सरस्वती व पार्वती माता!

सावित्री, अनसूया, अहिल्या, सीता!!६


मंदोदरी, तारा, रेणुकामाता,उर्मिला!

रुक्मिणी, तारामती, माता कौसल्या!!७


जिजाऊ,राणीलक्ष्मी,देवीअहिल्या!

गार्गी, मैत्रेयी, प्रकांड पंडिता पहिल्या!!८


बहिणाई, इंदिरागांधी, श्यामचीआई !

सुनिता, कल्पना, असो प्रतिभाताई!!९


सदा वंदनीय, स्फूर्ती दायी सरिता!

इहलोकी आल्या जनसेवे करिता!!१०



Rate this content
Log in