सोनसळी चाफा
सोनसळी चाफा
1 min
483
सोनसळी चाफा बघा
किती छान हा फुलला
सुगंधही बघा त्याचा
रूप रंगात खुलला ।
उन्ह कोवळे लेवून
चाफा खुलून फुलला
थवा फुलपाखरांचा
तया पाहून भुलला ।
सप्तसुरी वाऱ्यासवे
चाफा धुंद बेधुंदला
वाटसरू ते बघून
क्षणभरी थबकला
मना पाडतो भुरळ
चाफा हा रंगीबेरंगी
कधी असे गुलबक्षी
तर कधी पितरंगी ।
प्रभातसमयी येई
मंद सुगंध चाफ्याचा
त्याला न तोड कशाची
फिका गंध अत्तराचा ।