सोमवार सुप्रभात...!
सोमवार सुप्रभात...!
1 min
327
सो मवारची तारीख पाहिली
म ला तीन तेरा नऊ अठरा आठवले
वा टले देवा का बरे
र डके दिवस तू आम्हा दाखवले....
सु रुवात रडकी केलीस
प्र स्थ उगाच माजवलेस
भा ग्यात नको ते वाढून ठेवलेस
त गमग होणार नाही तर काय होईल..?
तसा तो हसला
म्हणाला चार दिवस थांब
हे ही दिवस जातील
पुन्हा चांगले दिवस येतील...
मी म्हटले अरे परमेश्वरा
सारा जन्म सरला
दोनाचे चार ही झाले
पण अजून वाट पाहणे संपले नाही...
तसा तो पुन्हा हसला
डर के आगे जीत है
क्या खा तो दम खा
आणि
बरंच शहाणपण शिकवून मार्गस्थ झाला...
