STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सोमवार सुप्रभात मजे मजेचा

सोमवार सुप्रभात मजे मजेचा

1 min
435

सोमवार सुप्रभात मजे मजेचा....!

सो स होता तो पुरा झाला

म ला खरा डाव कळला

वा टते तितके सोपे नसले तरी

र डून का होईना शब्द पाळला....

सु क्याबरोबर ओले जळते

प्र गतीच्या नावावर सारे खपते

भा गीले गुणिले आपोआप होते

त डफड मात्र झोप उडवते ....

म ला मला करता

जे आपले ते दुसऱ्याचे होते

म ला पाहिजे म्हणता

जे नव्हते ते आपले होते...

चा चा चाचा करता करता

    चहा घेता सारे सूर जुळून आले

    कधी नव्हे ते डाव सारे

    बघता बघता उघड्यावर पडले....

    म्हंटले झाले ते बरे झाले

    खरे खोटे सर्वांना कळाले

    स्वप्न पूर्तीच्या प्रयत्नाचे सार्थक होता

    स्वप्न पूर्तीचे श्रेय मिळाले....!



Rate this content
Log in