सोबत तुझी.......🌹
सोबत तुझी.......🌹
1 min
302
सोबत असावी लागतेच...
लेखणीला शाईची,
शब्द प्रत्यक्षात उतरविण्यासाठी
सोबत असावी लागतेच...
फुलाला काटयांची,
सुंदर फुले उमलण्यासाठी
सोबत असावी लागतेच...
अंधाराला प्रकाशाची,
सुर्योदय व सूर्यास्त होण्यासाठी
सोबत असावी लागतेच...
आनंदाला दुःखाची,
आयुष्य निरंतर जगण्यासाठी
सोबत असावीच लागतेच...
सुरांना शब्दांची,
मधुर संगीत गाण्यासाठी
सोबत असावी लागतेच...
माझ्या प्रितीला तुझ्या प्रेमाची,
जगण्यात सुंदर रंग भरण्यासाठी
