संवेदना
संवेदना
1 min
11.8K
कितीही हळवे शब्द जरी, संवेदना कायम आहे
निशब्द छायेची, कदाचित जखम ही खोल आहे
दुःख माझे कोणा सांगू, वाली इथे कोणी नाही
दुःखाच्या बाजार माझा, इथे कोणी मांडलेला
कुठलीही माणुसकी अन कुठले हे ऋणानुबंध
कितीही सुटले म्हणायचे पण गुंता कायम तसा आहे
मिटूनी डोळे घेता वेदना अजूनही कायम आहे
दुःख हे माझे मीच ह्याला तारण आहे