STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Others

3  

Varsha Patle Rahangdale

Others

संवाद संपला

संवाद संपला

1 min
502

वाटलं नव्हत कधी मला

आपल्यातील संवाद संपेल

मला तर वाटलं होतं आधी

तुझ्या सोबतीने अवघे जग जिंकेल


काय मागितले होते मी तुला

आपुलकीचे दोन शब्द फक्त

पण आला नात्यात दुरावा अनं

तु झालास नुसता सख्त


तो प्रेमाचा वाहणारा झरा

इतक्यात आटला असं वाटतयं

आणि नात्यातील स्नेहाच्या तारा

त्याही आता तुटल्या वाटतयं


तुला नाही का काहीच वाटतं

गतकाळात डोकावून पाहावे

एकमेकांसोबत घालवलेले ते क्षण

पुन्हा आयुष्यात परत आणावे


कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नाही

की तु माझ्याशी असा वागशील

बहाणे करून नेहमी बोलणारा तु

एवढ्यात कसा मला टाळशील


मी हजारदा स्वतः ला एकच प्रश्न विचारते

काय झाला गुन्हा बरे माझ्याकडून

काळजाला टोचते आता तुझे बोलणे

माफ कर मला मी माफी मागते वाकून


संसारात मला सुद्धा तुझ्या बरोबरीने स्थान दे

चुकले असेल काही माझे तर

प्रेमाने माझ्या पाठीवर तु थाप दे

पण आयुष्यभर संवाद मात्र सुरळीत चालू दे


Rate this content
Log in