संवाद गरज
संवाद गरज
1 min
213
अभिव्यक्तीला व्यासपीठाची गरज खरी
नाहीतर जगावे आयुष्यात मुक्यापरि
शब्द संवाद हवा मुका कारभार नको
मौनाने कधी गैरसमज पडदा नको
नको भेद जात धर्म वंश वेगळा जरी
संवाद नसता समाजामध्ये वाढे दरी
घोटून केलेल्या भाषणाचा रतीब नको
उधार उसनवारी केलेली कधी नको
बोलायला इथे आपली मातृभाषा बरी
बरसतील मग प्रशंसेच्या खऱ्या सरी
