संत तुकाराम!!
संत तुकाराम!!
देहू गावी जन्मं ! भाग्यवंत भक्त !
पंढरी दैवत ! घरी त्याच्या ||१||
नारायण कुळी!जन्मं झाला ज्याचा !
पुत्र बोल्होबाचा ! तुकाराम ||२||
सदा रामनाम ! मुखी असे ज्याच्या !
मागे धावे त्याच्या ! पांडुरंग ||३||
सर्वं शास्त्र पाठ ! मुखोद्गत वाणी !
चारी वेद वर्णी ! गाथा त्याची ||४||
इंद्रायणी वाहे ! निर्मळ ती गंगा !
तारी त्यां अभंगा ! पांडुरंग ||५||
भंग नसे कधी ! नावं त्यां अभंग !
सेतू झाला भंग ! श्रीरामाचा ||६||
म्हणे रामेश्वर ! दाह झाला अंगा !
कसा जाई भंगा ! तुकारामा ||७||
कोणी नाही मज ! भेटला तॊ वैद्य !
शांत करी क्रोध ! शरीराचा ||८||
ज्ञानदेवा पुसो ! गेलो मीच तिथं !
धरणे धरीत ! चौदा दिस ||९||
नाही आला गुण ! पाठविले येथे !
तुमचीया हाथे ! काही करा ||१०||
येताची शरणं ! शत्रू जरी असे!
कृपा अनारिसे ! त्याशी करा ||११||
संत लोटांगणी ! लाज नको मनी !
गेला लोटांगणी ! तुकोबाशी ||१२||
तुकोबा शरणं ! तेणेंचि ते जावे !
संकटी निवावे ! संतदासा ||१३||
