संत तुकाराम
संत तुकाराम
गेलो पंढरीला । विठू दर्शनास।
मनी लागे आस । भेट व्हावी।॥१॥
विठू दर्शनाने। बंद झाले डोळे।
तुकोबा आगळे । विठू लागे ।॥२॥
धन्य माझे भाग। तुझी भेट होई।
तुका विठू आई। भाग्योदय ।॥३॥
भक्ती ज्ञान निती। वैराग्य अभंगे।
विठू नाम रंगे। तुज ओठी ।॥४॥
जाती भेद नाही। कर्ज माफ करी।
मुखे नाम हरी । चिंतनात ।॥५॥
कसा रे बा तुका। आप्त झाले दूर।
परी सेवा केली। सामान्यांची।॥६॥
श्रध्देची दावली। वाट जनतेस।
अंधश्रद्धा भास। शिकवीत।॥७॥
सहज भाषेत। दिली शिकवण।
अभंगाची खाण। साहित्यात।॥८॥
बोले तुका मज। धावे मदती।
गोरगरीबास।भेटे हरी।॥९॥
अंतर्धान पावे।आशिष देवूनी।
अनुजा लिहूनी।आनंदते ।॥१०॥
