STORYMIRROR

Sangita Pawar

Others

4  

Sangita Pawar

Others

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज

1 min
184

सतराव्या शतकातील

संत तुकाराम वारकरी

जन्म झाला देहू गावात

आराध्य दैवत पंढरपुरी ||


समाज प्रबोधक असे

तूका ओळखे 'जगद्गुरु '

सांप्रदायिक अखंड परंपरा

मार्ग तो भक्तीचा सुरू ||


साक्षात्कारी निर्भीड असे

अभंग गवळणी महान

काव्य गोडवा, रसाळ

वाढवी महाराष्ट्राची शान||


भागवत धर्माचा कळस

महाभाग्य असे लाभले

जनतेच्या प्रेमरुपी हृदयात

अभंगरूपाने स्थिरावले ||


समाजातील अंधश्रद्धा

भोळ्या अशा समजूती

धर्मातील अनागोंदी संपवून

नवा धर्म ,नवी भाषा जमवती ||


Rate this content
Log in