संत सावता माळी
संत सावता माळी
1 min
182
अरण यां गावी ! जन्मं झाला ज्याचा !
माळी यां जातीचा ! सावता तो ||१||
कर्मात हा देवं ! पाहातसे सदा !
स्मरावे गोविंदा ! सदोदित ||२||
सावता सागर ! कर्म रुपी सारं !
शेतात ते घरं ! विठू राया ||3||
सावत्याचा मळा ! विठ्ठला चा डोळा !
ज्ञान ब्रम्ही कळा ! दावितसे ||४||
ज्ञान मार्गी गेले ! पूर्ण तेची झाले !
येर ते पडले ! खितपत ||५||
सर्वं व्यापी ईश ! पाहे तो सावता !
मुळा भाजी घेता ! विठ्ठलची ||६||
संतदास म्हणे ! पहावा सर्वत्र !
व्हावे ते सुपात्र ! दर्शनाशी ||७||
