STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

संत गाडगेबाबा (कविता)

संत गाडगेबाबा (कविता)

1 min
1.2K


संत गाडगेबाबा


सखुबाई झिंगराजी

यांच्या पोटी जन्मा आले

संत रे गाडगेबाबा

राष्ट्रसंत हो जाहले


होती किर्तन आवड

केली मनाची स्वच्छता

जाती भेद रे गाडूनी

केली निर्माण एकता


हाती घेऊनिया झाडू

करी चकाचक गाव

संत स्वच्छतेचा भोक्ता

बाबा गाडगे रे नाव


संसारात रे रमूनी

केली ईश्वराची भक्ती

जागे करुनी जगाशी

दिली कर्मकांड मुक्ती


भूतदया रे पेरली

बांध प्रथेस घातला

पशुहत्या नाही बरी

त्यांनी निर्बंध आणला


दीन दुबळ्या कल्याणा

दिन रात रे राबले

मुखी भजन किर्तन

बीज स्वच्छता पेरले


प्रथा प्रवृत्ती अनिष्ठ

केला टिकेचा प्रहार

साधी राहाणी ठेवून

दिला विज्ञान विचार


साहित्याला गुण द्या
लॉग इन