STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

संस्कृतीची छत्रछाया

संस्कृतीची छत्रछाया

1 min
158

तोरण दारी मंगळवेळी

पणत्या सजती दारोदारी

जात धर्म नव्हे तर मने जोडते

अशी मायभू महाराष्ट्राची दिपावली


तुतारीने दुमदुमले अंबर

जीवनात पसरे गोडवा

नववर्षाचे चैतन्य देतो

महाराष्ट्राचा पाडवा


वारी चालली पंढरीला

लागली ओढ विठुरायाची

चंद्रभागेचे दर्शन घेता

भेट घडते वैष्णवाची


संस्कार सारे थोर शिवबाचे

मज लाभले बळ मावळ्याचे

रक्षण करण्या सदैव सज्ज

दिव्य कडे सह्याद्रीचे


सुसंगती जपती मनी

अशी महाराष्ट्राची थोर ती पुण्याई

द्वेष लोभ अन् राग नसावा

सदैव जन्म घ्यावा

ह्या संस्कृतीच्या छत्रछायी



Rate this content
Log in