STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

4  

Santosh Jadhav

Others

संस्कृती

संस्कृती

1 min
28.3K


संस्कृतीच्या पाऊलखुणा गडद झाल्या तर 

टॉप जीन्समधल्या पोरी, नऊवारीत आल्या तर. 

पोरांनो या अगदी धोतर वा विजार पायजम्यात, 

याच पेहरावातल्या योजना, आमलात आल्या तर .

हाय नको ,बाय नको, ना नको सि यु 

रामराम , प्रणाम , नमस्कार आदबीनं झाले तर 

घरी आलेल्या पाहून्यास विचारपूस जिव्हाळ्याची 

 अन् स्वागताची सुरुवात, पाया पडून झाली तर.. 

येतो म्हणा जातो नका म्हणू 

आपुलकी पाहून कोणाच्या, डोळी पाणी आले तर. 

आईस मम्मी नको , ताईस नको सिस 

कष्ट उपसणारे पप्पा, बाबा झाले तर .

कशाला हवी कॅम-याची सेल्फी 

जेवढं जवळ जाता , मनाने जवळ आलात तर. 

मोठ्यांसमोर आदरी सुर, लहानांना समजावानं 

हे अगदी मनापासून केलात तर .

शेवटी संस्कृती जोपासने जरूरीचे 

काय होईल, ती लयास गेली तर. 

नवी पिढी नवे विचार मान्य सारं 

थोडी जुनी पिढी त्यांनी जोपासली तर .


Rate this content
Log in