Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

संस्कृती

संस्कृती

1 min
415


गड-किल्ल्यांचा मऱ्हाटी देश हा

महाराष्ट्र म्हणती ज्याला

शिवरायांच्या रयतेच्या राज्याची

संस्कृती लाभली याला


तीर्थक्षेत्रे, आणि भव्य मंदिरे

डोंगर-कपारीतली सुरेख लेणी

गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना,

संस्कृतीवैभव महाराष्ट्राचे आहे ना

थोर संत-विभूती, समाजसेवक

लोकपुरुष महाराष्ट्रास लाभले

राजकारण - समाजकारण ज्यांनी

सर्वांना कार्यातून शिकवले


लोककला, साहित्य, संस्कृती

कलावंत इथेच अशी ओळख आहे

देशातच काय, साऱ्या दुनियेत

महाराष्ट्र-संस्कृतीची ही ओळख आहे


Rate this content
Log in