संशय...!
संशय...!
1 min
563
संशय....!
संशयाचे भूत
संचारता माथी
गूढ होते
आपली मती
नाही त्यास
कोणता आधार
तरी जडतो
मनास आजार
खोल गर्तेत
जीव गुदमरे
फाडी उगाच
अंदाजी सदरे
लवलेश तीळ मात्र
नसता मनात
अब्रू जाय
फुका फुकी जनात
आग डोंब संशयाचा
भडकता डोक्यात
उपाय नसे काही
यासी अजूनी विश्वात
आपले आपण समर्थ
व्हावे लागते क्षणात
दूर सारण्या रोग
वसण्या आधी मनात
स्वच्छ मन निर्मळ
त्यात दरवळता प्रेम भाव
संशयाचे निराकरण
होते आपोआप....!
