STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

सण संक्रांतीचा

सण संक्रांतीचा

1 min
224

झाले बघा

संक्रमण

संक्रांतीचा

आला सण.


नवी वस्त्रे

हौस फार

स्त्रिया लेती

अलंकार.


सुवासिनी

साऱ्या गावा

लुटतात

वाण,आवा.


हरबरा

ऊस ,बोरे

आवडीने

खाती पोरे.


पतंगाचा

खेळ भारी

अंगणात,

छतावरी.


शीतकाली

आला सण

खाऊ उष्ण

राखू चण


तिळगुळ

उष्ण छान

संक्रांतिस

त्याचा मान


सण सांगे

परंपरा

एकतेची

कास धरा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन