STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Others

4  

मैथिली कुलकर्णी

Others

संकल्प मशाल

संकल्प मशाल

1 min
270

आकांक्षाचे पंख लेऊनी

सज्ज नवीन हे साल...

स्वागत करूया नववर्षाचे

पेटवू संकल्प मशाल।।


राहिले ते अपूर्ण सारे

काम करूया पूर्ण...

ठेच लागली तरीही चालू

झालो कितीही जीर्ण ।।


स्त्री शक्तीच्या उत्कर्षास

लावूया हातभार....

माता, बहीण,प्रिय सखी ती

जीवनाचा आधार ।।


स्वतःस च हे समजावत 

करूया आता सुरुवात..

आत्मविश्वासाने चालू

झेलून सारे आघात।।


आत्मनिर्भर भारताची

कास आपण धरूया....

स्त्री शक्तीच्या प्रगतीस

आनंदाने स्वीकारूया।।


संकल्पाची ही मशाल

धगधगती ठेऊन....

झटूया प्रतिदिन याचसाठी

देहभान विसरून ।।


Rate this content
Log in