STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

संगीत

संगीत

1 min
24K

संगीत मनाचा ठाव घेतं 

सुंदर स्वप्नांचं गाव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||0||


किती भाषा या जगात 

किती बोली या जगात 

याहून सरळसाधी मित्रा 

गाण्याची खोली या जगात 

तूझ्या व्यक्तिमत्वाला 

सुंदर साजेसं नाव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||1||


भाषा एकच हृदयाची 

संगीतात सामावली 

प्रत्येकाला या जगात 

हिच भाषा भावली 

गुंफलं ज्याचं हृदय यात 

जग त्याला भाव देतं  

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||2||


किती मने जगात या 

झाली होती छिन्नविछिन्न 

दुःख अवतीभवती आणि 

जीवन होते पुरते खिन्न 

सुखाचा मनाला त्यांच्या 

एक नवा पेहेराव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||3||


किती जखमा किती दुःख 

किती वेदना दाटल्या 

सुखाच्याही नद्या इथे 

हृदयी ज्यांच्या आतल्या 

मलम देतं जखमेवर 

ज्यांना जग घाव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||4||


गात रहावे वेदनेने 

कहर केला असताना 

अनिष्टाच्या दलदलीत 

सरळ सरळ धसताना 

गाणं तुझं हृदयातलं 

दुःखाला मज्जाव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||5||


दुखात आणि सुखात 

गीत गुणगुणावं 

सोडून वेदनेची मिठी 

सुखाला खुणावं 

गीत तूझ्या मनाला 

एक नवा पडाव देतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||6||


दुःख कवटाळणाऱ्याची 

फक्त आसवेच गळणार 

जीवनाच्या गाण्याची 

चव त्याला कशी कळणार 

हृदयी गीत फुलतं ज्याच्या 

सुख तिथे धाव घेतं 

जरा न्हाऊन बघ या सागरात तू 

चंचल मनाला ठहेराव देतं ||7||


साहित्याला गुण द्या
लॉग इन