संघर्ष जीवनाचा
संघर्ष जीवनाचा

1 min

12.4K
भिमाबाईंचा हा सूर्य
रामजींची ही पहाट
अज्ञानाच्या अस्तासाठी
शिक्षणाची पायवाट
पिढ्यान पिढ्या अडाणी
किती संघर्ष जीवनाचा ?
समतेत मार्ग होता
घेता वसा शिक्षणाचा
न्यायासाठीच लढले
दिले भारताला दान
कायद्याने लोकशाही
नांदवितो संविधान
जीर्ण प्रथा परंपरांना
स्वतः दिली तिलांजली
विचारांना आचरणी ठेवू
हीच खरी आदरांजली