STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

4  

swati Balurkar " sakhi "

Others

संध्या

संध्या

1 min
461

ही संध्या -

कधी कधी

वेगळीच भासते मला,

जेव्हा ती नेते-

आठवणींच्या

गूढ गर्तेत मला!

कदाचित

ठाऊक नसेल तुला,

माझ्या काजळरेषेच्या खाली

आजही दडलायस तू 

गुप्त अश्रु बनूनी!

ही संध्या - भास करवते,

माझ्या एकाकी जीवनाची!

ही संध्या,

कधी कधी

जाणीव करवते ,

तू जीवनात नसण्याची पण !

ही संध्या -

दिवस आणि रात्रीच्या

मिलनाची आणि

त्यांच्याच दुरावण्याची पण!


Rate this content
Log in