STORYMIRROR

Vilas Kumbhar

Others

4  

Vilas Kumbhar

Others

संदेश हा दिपावलीचा

संदेश हा दिपावलीचा

1 min
623

आत्मज्योत नव्या आशेची ,

चैतन्याची ,दृढ विश्वासाची

आत्मज्ञानाची,गुढी यशाची ,

मनामनात तेवत ठेवूया .

    एक ज्योत माणूसकीची ,

    निराधारांच्या आधाराची

    रुग्णांच्या जीवनदानाची, 

    मनामनात स्वयंस्फूर्त लावूया .

एक ज्योत ती कृतज्ञतेची,

सीमेवरील सज्ज जवानांसाठी ,

अहोरात्र राबणाऱ्या पोलीसांसाठी,

मनामनात सतत सजग बानूया .

    एक ज्योत आत्म प्रेरणेची

    रूग्णसेवेत झटणाऱ्यां साठी.

    डाॅक्टर,परिचारिका सेवकांसाठी,

    मनामनात जागृत करूया .

एक ज्योत आत्मनिर्भरतेची ,

अज्ञान तिमीर उजाळण्यासाठी ,

एक सद्भावनाज्योत एकात्मतेची,

बंधूभाव व देशप्रेमाची मनी लावूया .

    संदेश हा आज दिपावलीचा,

    लावू एका ज्योतिने लक्ष दीप .

    स्नेह तेलातल्या निर्धार वातीचा,

    मनोमनी आत्मविश्वास जागवूया


Rate this content
Log in