स्मशान
स्मशान
1 min
14.2K
दगडा- मातीची माझी शाळा
भुकंपात पडून गेली...
पुनर्वसनाच्या नावाखाली
गावाबाहेर उडून गेली...
तसं गावच्या गाव माझं
शांत स्मशान झालं...
कुणीच कोणास विचारलं नाही
ढीगा-याखाली कोण मेलं...
पहाट किंकाळ्यांची
भेसूर वाटतं होती...
किलकिली सकाळ मात्र
डोळे चोळत उठत होती...
पांढ-या मातीखाली
श्वास अडकून गेला होता..
पिकली पान सोडून
अख्खा गाव मेला होता..
