स्मरण हुतात्म्यांचे
स्मरण हुतात्म्यांचे
1 min
181
शिक्षणाने सर्वांचा विकास होतो
सांगून गेले फुले शाहू आंबेडकर
जाणून घ्या एकतेमध्ये ताकद आहे
दाखवून दिले गांधी टिळक नि आगरकर
थोरा मोठ्यांचे बोल वाचतो ऐकतो
पण त्यावर कार्यवाही काही होत नाही
शपथा नि प्रतिज्ञा घेतो मोठ्याने
पण अंमलबजावणी काही होत नाही
हुतात्मा क्रांतिकारकांचे स्मरण करून
प्रत्येकाने पुढचे पाऊल ठेवले पाहिजे
त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंब न थेंबाचे
उत्तरदायित्व घेऊन जगले पाहिजे
हार घालण्यापुरते दिन साजरा करू नये
रक्तात त्यांची स्फूर्ती चढली पाहिजे
आपला देश असाच स्वातंत्र्य झाला नाही
प्रत्येकाचे बलिदान स्मरणात राहिले पाहिजे
