STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

स्मरावे पितरांना

स्मरावे पितरांना

1 min
228

पूर्वजांना स्मरावे श्राद्धपक्षात 

होईल आपली भरभराट

जीवनात तुम्ही छळले जरी 

आईवडिलांस त्यांची माया अफाट


ज्यांच्या कृपेने सृष्टी पाहिली

विसरू नका त्यांच्या कर्तृत्वास

नम्रपणे पितरांना स्मरावे आपण

तत्पर असे ती समर्थ मार्ग दाखविण्यास


मिळेल सद्गती पितरांना

कर्मधर्म आचरण ठेवू शुद्ध

दान तर्पण यज्ञ संध्या वंदना

होईल मोक्षाची वाट समृद्ध


वडा भात खीर पंचामृत 

पक्वान्ने आवडीची नैवेद्यास

होईल तृप्ती पितरांची अन्

उद्धरील ती पण आपणास...


अग्नी वरूण वायु पंचमहाभूते

तनामनाचे असती कुलंरक्षक

सत्कार्य करूनी मनापासून

सरतील मुक्तीमार्गातील भक्षक


Rate this content
Log in