समजून मजला घेशील ना
समजून मजला घेशील ना
1 min
408
तुला सांगता नाही आले
नजरेतून तू समजुन घेशील ना
मन माझे होईल अस्थिर
तर मला तू धीर देशील ना
नकळत तुला जर दुखावले
तर माफ मला करशील ना
डोळ्यातून अश्रू जर ओघळले
तर हळूच तू टिपशील ना
मला जर एकटे वाटले तर
मला तू सावर्शील ना
मे जर भांडले तुझ्याशी
तर विसरून सगळं जाशील ना
खरं माझ्यावर अखंड प्रेम करशील ना
मला तू समजुन घेशील ना
मला तू समजुन घेशील ना
