समजणं फार अवघड असतं
समजणं फार अवघड असतं
समजणं फार अवघड असतं
वाट ही अवघड नव्हती
अवघड होते मार्गातले काटे
कठीण नव्हते आयुष्यातले प्रश्न
उत्तर मिळणे कठीण होते
नाती जोपासना सोप्प होतं
पण कठीण झालं नातं सारं
आपले मानून समोरच्याला
स्वभाव समजण्यात परके झाले
नुसते हो म्हणणारे खूप असतात
पण वेळीच उपयोगी पडणारे कमी असतात
निस्वार्थ सेवा देणारे कमी असतात
स्वार्थ साधणारे जास्त दिसतात
अजब दुनियेच्या खेळ निराळा असतो
ज्याला आपण आपले समजतो
वेळेवर दगा देणारा आपलाच ठरतो
खरंच जग हे निराळं असतं
समजणे फार अवघड असतं
समजणे फार अवघड असतं
