समाधान
समाधान
1 min
11.3K
प्रेमात कधी समाधान मिळत नाही
कितीही मिळाले तरी ईच्छा काही पूर्ण होत नाही
प्रेमात माणसाला माणुसकी येते
न करणारे काम त्याला करावे लागते
प्रेमात रागही पचवता येते
संकटावर मातही करता येते
प्रेमाविणा लोकं चिडचिडे होतात
होणारे काम ही बिघडवून घेतात
प्रेमात ईच्छा शक्ती प्रबळ होते
दुसर्याच्या सुखात स्वतःला खुशी होते
तरी प्रेमात कधी समाधान मिळत नाही
कितीही मिळाले तरी ईच्छा भरत नाही