सकळ
सकळ

1 min

11.6K
संपला अंधार
उजेड झाला
जागा हो मानवा
प्रकाश माथ्यावर आला....
खग घरट्यातून
बाहेर आता पडले
पिलांसाठी चारा
शोधू हो लागले.....
माय करते धावपळ
आपल्या मुलांसाठी
सतत ती राबते
आपल्या कुटुंबासाठी.....
स्वारी आली वासुदेवाची
आजी धान्य दान देते
झोळी भरून वासुदेवाची आजी
मुखी वासुदेवाचा आशिष घेते