STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

सख्या जिवलगा

सख्या जिवलगा

1 min
144

दूर उभा का रे

सख्या जिवलगा

वेगीं धाव घेई

आता पांडुरंगा।।१।।


तुझ्या भेटीसाठी

जीव कासावीस

डोळ्याने बघावे

एवढीच आस।।२।।


गुपित मनाचे

कुणापुढे सांगू

मनाला शांतता

कुणाकडे मागू।।३।।


सोडुनी घराला

आले तुझ्या दारी 

नित्य नेम होते

देवा तुझी वारी।।४।।


सख्या जिवलगा

आता भेट द्यावी

तुझ्या भक्तावरी

कृपादृष्टी व्हावी।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन