STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

सख्खे शेजारी

सख्खे शेजारी

1 min
707

माझे नातलग

माझेच शेजारी

नाही दिसतसे

यांना बरोबरी.....


कर्णीक आजोबा

भास आकृतीचे

मात्र डोक्यातच

जाळे विचारांचे.......


नाही दिसे त्यांना

सूर प्रभातीचे 

मुखी राम नाम

बोल अंतरीचे......


काका साहित्यिक

रचियता कवी

खूश सदोदित

पत्रकार भावी......


सख्य कुटुंबाचे

येणे जाणे आहे

चांगलेच देणे

चांगलेच पाहे.....


दोन्ही घरे छान

समोरासमोर

पाहे एकमेका

आहे हो शेजार.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन