STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

सकारात्मक विचार

सकारात्मक विचार

1 min
760

मृत्यू अटळ आहे म्हणून मरणाला तू भिऊ नको

कोरोना फैलावतोय बाहेर फिरायला तू जाऊ नको


कोरोना पसरतोय संपर्काने कुणाशी संपर्क करू नको

दुरून नमस्कार कर हातात हात कोणाच्या मिसळू नको


काळजी घे स्वतःची इतरांना काळजीत तू टाकू नको

काही दिवस आहेत संकटाचे धैर्य तू सोडू नको


सकारात्मक विचाराने जग मन विषण्ण करू नको

जग हे खूप सुंदर आहे वाईट विचार मनात आणू नको


Rate this content
Log in