सकाळचे सूर
सकाळचे सूर
पहाटेचा मंद वारा
अंगावरती येई शहारा..
सळसळत्या लाटेवरूनी
अलगद फीरे मोरपिसारा...
स्तब्ध सारी वृक्षवल्ली
देऊ लागली पहारा...
कोंबडा आरवता
जाग आली चराचरा...
पक्षी निघे घरट्यातून
शोधण्या पिलास चारा...
फुटे पान्हा गोठ्यात
गाईस बघता वासरा...
सोनसळीच्या ऊन्हात
सूर्यकिरण फुलवी पिसारा...
पारिजात अंगणात
दरवळे परिसर सारा ...
दिमाखात तुळस उभी
मधोमध तिचा डोलारा...
कष्टकरी शेतात जाई
बिगीबिगी भराभरा...
