सकाळ....
सकाळ....
1 min
353
निसर्गाशिवाय सकाळ आहे ती अपूर्ण,
सूर्यदर्शनाशिवाय हाेवू शकत नाही पूर्ण...
पशूपक्ष्यांशिवाय सकाळ अधुरीच राहिल,
किलबिलाटाशिवाय मनुष्य कसा जागील...
देवाशिवाय सकाळ कल्पना करवत नाही,
श्रध्दा, भक्तीशिवाय जगात काही उरत नाही...
स्वत्व आत्मशक्तीशिवाय अपूर्ण राहिल सकाळ,
ऋतुचक्रावाचून पूर्ण हाेणार नाही जीवनमाळ...
