सकाळ
सकाळ
1 min
310
झुंजूमुंजू पहाट झाली
तांबडा सूर्य आला वर
सोनेरी प्रकाश किरणे
उधळण झाली नभावर
घरट्यातून पक्षी उडाले
गायी म्हशी रानात निघाले
बायका चालली कामावर
उधळण झाली नभावर
शाळेची ही घंटा वाजली
ऑफिसची ही वेळ झाली
प्रत्येकजण असे रस्त्यावर
उधळण झाली नभावर
सूर्यास्त होता सायंकाळी
पक्षी घरट्यात परतली
काळा कुट्ट पसरला अंधार
उधळण झाली नभावर
