सीता
सीता
1 min
359
जनकाला सापडली भूमीत सीता
सुंदर, सुकोमल कन्या बघून झाला जनक तिचा पिता
तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपले
शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाशी वरले
रामाची पत्नी होऊन झाली धन्य ती
वनवाशीही गेली समवेत पती
मृगजळाच्या मोहाणे केला घात
रावणाच्या अपहरणाचा होता तो घाट
वानराच्या साहाय्याने केले रामाने मुक्त
धोबीच्या संशय्याने झाली रामापासून विभक्त
अग्निपरीक्षा दिली कठोर लोकांदेखत
सामावून गेली भूमीच्या कुशीत सर्वांदेखत
